कोकणातील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही : उद्योग मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया
रत्नागिरी : कोकणातील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही, यासाठी माझे प्रयत्न असतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आल्यानंतर दिली. मारुती मंदिर येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे औपचारिक उद्घाटन त्यांनी केले. विनायक मेटे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे सांगत शिवसृष्टीचे औपचारिक उद्घाटन संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ना. सामंत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी आणलेला भलामोठा 20 फुटी हार त्यांनी नाकारला. या हाराने मी माझी सैनिकांचा गौरव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सैनिकांचे योगदान मोठे असल्याने त्यांना या हाराने गौरवणार असल्याचे ना. सामंत म्हणाले. ना. सामंत यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी मारुती मंदिर परिसरात केली होती.