कोरोना आणि एसटी संप कालावधीतील भाडे माफ करावे; बसस्थानक व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
खेड : कोरोना महामारी आणि एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एस. टी. ची चाके थांबली होती. पर्यायाने बसस्थानक आवारातील व्यावसायिकांची दुकाने बंद राहिल्याचा मोठा आर्थिक फटका एसटीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना बसला. यातून सावरण्यासाठी कोरोना कालावधी आणि संप काळातील हे भाडे महामंडळाने माफ करावे, अशी मागणी राज्यातील सर्व एसटी व्यापाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महामंडळाकडून कोरोना काळातील आणि संप काळातील भाडे वसुली सुरू करण्यात आल्याने दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.