अभ्यंकर विद्यामंदिर येथे वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

रत्नागिरी : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी लोकमान्य टिळक व भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. कार्यक्रमात शाळेतील 36 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. कार्यक्रमात प्रत्येक इयत्तेच्या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याने भाषण केले. कार्यक्रम इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची बालसभा घेऊन साजरा करण्यात आला. बालसभेचे अध्यक्षस्थान अन्वित डांगे याने भूषविले. सूत्रसंचालन मेघना मलुष्टे हिने केले तर विद्या लिंगायत हिने आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, प्रशस्तीपत्रकप्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच बालसभेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या स्पर्धेत इयत्ता पहिली- प्रथम प्रार्थना बोरकर, द्वितीय- श्रीशांत दिवाडकर, तृतीय- सान्वी गावखडकर, उत्तेजनार्थ- देवाशिष जोशी, प्रीती कोळगे, लावण्या मायंगडे, रेयांश पेजे, शर्व गावडे, मोहित सुवरे. इयत्ता दुसरी- प्रथम- श्रीरंग दामले, द्वितीय- सुमुख काळे, तृतीय- मनवा मालप, उत्तेजनार्थ- वरद गावखडकर, अवनिश फडके, ओजस्या गोगटे, ओवी साळवी, गौरी शेट्ये, चैतन्य लिंगायत. इयत्ता तिसरी- प्रथम- स्पृहा भावे, द्वितीय- अन्वित डांगे, तृतीय- आराध्य महाडिक, उत्तेजनार्थ- दुर्वा मुरुडकर, गार्गी देवल, स्वरा थोरात, ध्रुव बुरोंडकर, आदित्य घडशी, आदित्य गोठणकर, चिन्मय  दामले. इयत्ता चौथी- प्रथम- अर्णव पटवर्धन, द्वितीय- स्वरा साळुंखे, तृतीय (विभागून)- निधी जोशी, निर्मयी जोशी, उत्तेजनार्थ- मुद्रा जोशी, रिद्धी पवार, मानस लिंगायत, आस्था कांबळे, आरोही आलिम यांनी यश
मिळवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button