चिपळूणमध्ये आज भाजपचा कार्यकर्ता मेळावा; नीलेश राणेंची उपस्थिती
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी चिपळूण शहर भाजपच्यावतीने रविवारी दि. 31 रोजी झालेल्या बैठकीत शहरातील प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क अभियान राबवून मतदार नागरिकांचा कल समजून घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. माजी खा. नीलेश राणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील सत्तांतरानंतर चिपळुणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. न.प. सार्वत्रिक निवडणूकपूर्व शासकीय नियोजन पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना, मतदार नोंदणी आरक्षणे जाहीर झाली आहेत. त्यामुळे बहुतांश राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. आता निवडणूक लढविण्याची रणनिती ठरविण्यासाठी चिपळूण शहर भाजपच्यावतीने रविवारी प्रमुख कार्यकर्तेे व पदाधिकार्यांची बैठक झाली. शहर अध्यक्ष आशिष खातू यांनी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली. यावेळी शहरातील सर्वच प्रभागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे जाणून घेण्यात
आली.
त्याचबरोबर प्रभाग रचना, आरक्षण व त्या-त्या प्रभागात पक्षाचे असलेले पदाधिकारी व त्यांचा जनसंपर्क या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेनुसार इच्छुक उमेदवारांसह संबंधित प्रभागातील प्रमुख पदाधिकार्यांनी जनमताची माहिती घ्यावी, मतदार व नागरिकांकडे संपर्क मोहीम सुरू करावी, जनमताचा अंदाज घ्यावा, त्यानंतर पक्षाकडून कोअर कमिटीच्या माध्यमातून योग्य इच्छुक उमेदवाराची निवड केली जाईल, असे स्पष्ट करण्यात
आले.