शिपोशी सालपे येथे विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरीची
लांजा : येथील शिपोशी-सालपे येथे विद्यर्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना 16 मार्च 2021 रोजी सकाळी 10.30 वा. समारास घडली होती.
अरुण दत्ताराम सुतार (वय 35, रा. शिपोशी ता. लांजा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली होती. त्यानुसार,आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा चुलत मामेभाऊ आहे.16 मार्च रोजी नेहमीप्रमाणे पीडित विद्यार्थिनी बसमध्ये बसून शाळेत जाण्यासाठी सालपे येथे उतरली. बसमध्ये तिच्या हाताला ग्रीस लागले होते. ते काढण्यासाठी पायवाटेत दप्तरातील पाण्याची बाटली काढून हात धुवत होती. तेव्हा आरोपी अरुण सुतारने तिथे येऊन वाईट हेतूने तिचा हात धरला आणि पायवाटेवरील झाडीत ओढू लागला. काटेरी झाडांमुळे तिला दुखापतही झाली. तिने आरडा-ओरडा केला तेव्हा पाय वाटेने जाणार्या-येणार्या वाटसरुंना पाहून अरुणेने सालपे बस स्टॉपच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी पीडित मुलीने सायंकाळी घरी गेल्यावर आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर आईने लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील तपास करत होत्या. तपासात पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला गेले वर्षभर सुरु होता. सोमवारी या खटल्याचा निकाल विशेष पोस्को न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. अनुपमा ठाकूर यांनी 9 साक्षिदार तपासात केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश वैयजंतीमाला राऊत यांनी आरोपीला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.