
देवरूख येथील शहीद स्मारकस्थळी कारगिल विजय दिन साजरा
देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शहीद स्मारकस्थळी कारगिल विजय दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. शहीद स्मारकस्थळी कारगिल युद्धात सहभागी झालेले निवृत्त सैनिक व इतर माजी सैनिक यांच्यासह संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी सैनिक अमर चाळके, पुंडलिक पवार, महेश सावंत, सुनील जाधव, सुभाष मोरे, तुकाराम खेडेकर, यशवंत खरात, सूर्यकांत पवार यांच्यासह नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मदन मोडक, पत्रकार प्रमोद हर्डीकर व सुरेश करंडे, संस्था पदाधिकारी कुमार भोसले, शिरीष फाटक, बबन बांडागळे, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, मधुकर कोकणी, मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.