जुवे येथे आंबा कलमाची फांदी तोडताना पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी : जुवे गावात आंबा कलमाची फांदी तोडताना झाडावरून खाली पडून प्रौढाचा मृत्यू झाला. देवजी जानू गोताड (वय 50, रा. गोताडवाडी काजरेकोंड, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवार 23 जुलै रोजी दुपारी 3.15 वा. घडली. भाऊ सखाराम जानू गोताड (वय 60, रा. गोताडवाडी काजरेकोंड, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देवजी गोताड हे जुवे येथील हारक्या कीर यांच्या बागेत कामाला गेले होते. तेथील आंबा कलमाची फांदी तोडत असताना तोल जाऊन देवजी गोताड खाली खडकावर पडले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या पुतण्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी गोताड यांना तपासून मृत घोषित केले.