सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरी महामार्गावर डिव्हायडर तोडून बनवलेले अनधिकृत ‘शॉर्ट कट’ मार्ग वाहनचालक व प्रवाशांसाठी जीवघेणे

0
98

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनाचा प्रवास ‘सुसाट’ झाला आहे.मात्र याच चौपदरी महामार्गावर डिव्हायडर तोडून बनवलेले अनधिकृत ‘शॉर्ट कट’ मार्ग वाहनचालक व प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीतील महामार्गाच्या खारेपाटण ते झाराप ( झिरो पॉईंट) पर्यंतच्या टप्प्यात तब्बल 56 ठिकाणी असे जीवघेणे शॉर्टकट मार्ग तयार केले आहेत. जिल्हा परिवहन अधिकार्‍यांनी महामार्गाच्या केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here