
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांनी विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड सुरक्षितस्थळी नेले
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे.पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड किल्ल्यावर देखील असाच प्रकार आढळून आला. शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्यानंतर तेथील घसरलेले दगड एकत्रित करून रणमंडळ टेकडीवर जमा करण्यात आले आहेत.सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांनी काल किल्ले विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगडसुरक्षितस्थळी नेले. या सर्व मावळ्यांनी काल रविवारी गड संवर्धन मोहिम राबवत ढासळलेल्या दगडांना सुरक्षितस्थळी नेले. हर हर महादेवचा जयघोष करत तब्बल सात तास जिद्दी मावळ्यांनी लढा देत मोहिम फत्ते केली. खांद्या वरून एक एक दगड वाहून नेत मोहिम राबवण्यात आली. अनेक जिल्ह्यातील मावळे या मोहिमेसाठी स्वयंस्फूर्तीनेगडसंवर्धनासाठी दाखल झाले होते. यामध्ये 25 युवतींचाही समावेश होता. सर्व दगड रणमंडळ टेकडीवर ढीग लावून ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, बुरुजाची बांधणी होईपर्यंत मार्ग बंद राहिला आहे.
www.konkantoday.com