
खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ
खेड : शहरात सकाळपासूनच जगबुडी नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. दिवसभर पावसाचा जोर सुद्धा अधिक आहे. सोमवारी रात्री 11 वाजता नदीने धोका पातळी ओलांडली. खेड शहरात मटणमार्केट जवळ पाणी आले आहे. 12 जुलैला जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. खेडवासियांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.