पावस येथे एसटी-दुचाकीच्या अपघातात गवळीवाड्यातील दुचाकीस्वार ठार
रत्नागिरी : पावस-हर्चे मार्गावरील स्वामी स्वरूपानंद भक्त निवास येथे झालेल्या एसटी व दुचाकीस्वार यांच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यामध्ये एसटी व मोटारसायकल यांचे नुकसान झाले आहे. माणीक गंगाधर दहिफळे (वय 38) हे शुक्रवारी 8 रोजी आपल्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच 14, बीटी 0180 ही घेऊन हर्चे पावसमार्गे रत्नागिरी असे जात होते. एसटी बस सकाळी दहा वाजताच्या सुमारास पावस भक्तनिवास धर्मशाळा येथे आली असता दुचाकीस्वारासोबत धडक झाली. विनोद अनिल गोताड (वय 50, राहणार गवळीवाडा, रत्नागिरी) असे दुचाकी चालकाचे नाव आहे. ते आपल्या ताब्यातील दुचाकी एमएच 08, एआर 0046 घेऊन वेगाने विरुद्ध बाजूला येऊन एसटीच्या दर्शनी भागाला जोरदार ठोकर दिली. झालेल्या या अपघातात गंभीर दुखापत होऊन दुचाकी चालक जागीच ठार झाला. याबाबत पोलीस अंमलदार संदेश चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.