धोपेश्वर गावात डोंगर खचत असल्याने स्थलांतराच्या नोटिसा

राजापूर : शहरालगत असलेल्या धोपेश्वर गावात डोंगर खचत असल्याने त्या खाली असलेल्या मानवी वस्तीला असलेला धोका पाहता तेथील 120  व्यक्ती व 29 कुटुंबियांना सुरक्षित स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा येथील प्रशासनाने दिल्या आहेत. आणखी सात कुटुंबियांना स्थलांतराबाबतच्या नोटीसा दिल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जामदा नदी पात्रातील पुराची वाढती पातळी पाहून जवळेथर येथील 9 व्यक्ती व 4 कुटुंबे यांनादेखील सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा प्रशासनाने दिल्या आहेत . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button