वैश्ययुवा गुणवन्त विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळा
आज दिनांक 3 जुलै 2022 रोजी आपल्या समाजाच्या दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील 25 विद्यार्थ्यांनचा सन्मान करण्यात आला व त्यांचा भावी आयुष्याला शुभेच्छारुपी सन्मान चिन्ह व पुष्प देण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजित हेगशेट्ये सरांची उपस्थिती होती सरांनी सर्व विद्यार्थी मित्र व वैश्ययुवा प्रतिनिधींना आपल्या करिअरच्या अनोख्या वाटा व जिवनाकडे अनोख्या नजरेने बघण्याचा कानमंत्र दिला सरांचे मनोगताने सभागृह मंत्रमुग्ध झाला
पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक विकासामध्ये शिक्षक व पालक यामधील नातं निर्माण कारणांच्या अनोखा सल्ला अजिता मलूष्टे यांनी दिला तर विरेंद्र वणजु यानी वैश्ययुवा ही संस्था सर्व समाजच्या सुख दुःखात नेहमी अग्रस्थानी असते तसेच समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी आपली बाजू मांडली व्यासपीठारील श्री दादा प्रसादे व मकरंद खातू यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या
श्री हेमंत वणजु यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आताची शिक्षण पद्धत व पूर्वीच्या शिक्षण पद्धतीची माहिती दिली
या उपक्रमामध्ये श्री प्रभाकर शेठ भिगार्डे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मिठाई दिली
ध्वनी व्यवस्था श्री राकेश बेर्डे यांनी पहिली
या उपक्रमामध्ये सुनील बॅंडखळे यांनी आभार व्यक्त केले
या वैश्ययुवाच्या उपक्रमाची उपक्रम प्रमुख म्हणून तसेच आपल्या खुमासदार शैलीन सूत्रसंचालनाची जबाबदारी गौतम बाष्टे यांनी घेतली होती
तसेच विद्यार्थ्यांना सन्मानामुळे आंनद झाला अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या
तर पालकांनी समाधान व्यक्त केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोर दळी,अभिज्ञ वणजू,नागेश जागुष्टे, सुमीत संसारे,कौंतेय खेडेकर,ऋषी धुंदूर यांनी मेहनत घेतली.
टीम वैश्ययुवा