महाड शहरात शिरू लागले सावित्री नदीचे पाणी
महाड: मुसळधार पावसाने सावित्री नदीची पाणी पातळी 4.20 मीटर एवढी झाली आहे. नगर पालिकेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलादपूर- महाबळेश्वर खोऱ्यामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. पालिका मुख्याधिकारी रोडगे यांनी संबंधित यंत्रणेला माहिती दिली आहे. पाण्याची पातळी पाच मीटर पोहोचल्यानंतर महाड शहरात भोंगा वाजवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.