वेरळ मुस्लिमवाडी येथे कार – कंटेनरचा अपघात
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ मुस्लिमवाडी येथे कार व कंटेनर यांच्यात सकाळी 9.30 वाजता अपघात झाला. मुंबईवरून कुडाळला जाणाऱ्या कारला गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. शंकर गंगाराम अनावकर (वय 49), तृप्ती व्यंकटेश नरसुले (वय 55, मुंबई) हे दोघेजण गंभीर जखमी असून कंटेनर चालक संजीवन कुमार (वय 36) हाही जखमी आहे. एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.