रत्नागिरी रहाटाघर बस स्थानकात खड्डे व चिखलाचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष
रत्नागिरी शहराच्या मुख्य बसस्थानकाचा प्रश्न रेंगाळला असून ते काम अनेक वर्षे बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे हे काम कधी पूर्ण होणार याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही अशातच सध्या सुरू असलेल्या
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी रहाटाघर बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर गैरसोयी असून सामान्य प्रवासी त्यामुळे हैराण झाले आहेत
बसस्थानकाच्या परिसरात मोठमोठे खड्डे व डबकी झाली असून आता पडत असलेल्या पावसामुळे हे संपूर्ण खड्डे पाण्याने भरले जात आहेत त्यामुळे या बसस्थानकात प्रवेश करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे खड्ड्यात व डबक्यात भरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.गाड्या फलाटावर येताना या खड्ड्यातून येत असल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे.बसस्थानकाच्या परिसरात मोठमोठे डबके असल्याने गाड्यादेखील त्यातच उभ्या केल्या जात आहेत
हे खड्डे व डबके त्वरीत भरुन प्रवाशांची व नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दुर करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे,
www.konkantoday.com