धावत्या एसटी बसमध्ये चालकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
चिपळूण : धावत्या एस. टी. बस मध्ये हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने एस. टी. बस चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. वाल्मिक शंकर कोळी (42, पोतले, कराड) असे मृत्यू झालेल्या वाहकाचे नाव आहे. मंडणगड आगारातून शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मंडणगड ते मिरज अशी बस सुटली. ही बस पाटण येथे आली असता वाहक कोळी यांच्या छातीत कळ आली. त्यांनी ही माहिती चालकाला दिली. त्यानंतर लगेचच चालकाने गाडी थांबवून नावरस्ता येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी तपासाअंती कोळी हे मृत असल्याचे सांगितले. त्यांच्या मृत्यूने चालकालाही धक्का बसला. त्याने याबाबतची खबर आगारात दिली.