कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकातील इमारतींच्या भिंतीवर वन्यप्राणी व पक्षांची चित्रे रेखाटून सजावट

कोकण रेल्वेगाड्यांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनव्या संकल्पनांचा अवलंब करत त्या अंमलातदेखील आणत आहे. या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासन व वनविभागाच्या रेल्वे प्रशासन व वनविभागाच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानकातील इमारतींच्या भिंती वन्यप्राण्यांसह विविध प्रकारच्या पशु-पक्षांच्या चित्राकृती रेखाटून सजवण्यात आल्या आहेत.
कोकणातील सौदर्याचा आनंद लुटता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने आजवर नव्या संकल्पना राबवल्या आहेत. या पाठोपाठ रेल्वे प्रशासनाने वन्यप्राण्यांसह विविध प्रकाच्या पशु-पक्षांची माहिती मिळावी, यासाठी कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकातील इमारतींच्या भिंतीवर वन्यप्राणी व पक्षांची चित्रे रेखाटण्याचे काम हाती घेतले आहे. कोकणातील मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकांतील इमारतींच्या भिंतीवर ही चित्रे रेखाटण्याचे काम वेगाने सुरू आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button