नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा एकाचवेळी अनेकांना संदेश, सूचना देण्यासाठी वापरली जाणारी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम म्हणजेच सार्वजनिक उदघोषणा प्रणाली आता कोल्हापूरनंतर रत्नागिरी जिल्ह्यातही उभारली जाणार आहे. गतवर्षीची २२ जुलैची अतिवृष्टी आणि महापुरानंतर जिल्ह्यात ही प्रणाली उदयास येत असून त्यामध्ये शहरांसह दुर्गम भागातही आपत्तीजनक स्थितीत एकाचवेळी सूचना, संदेश दिले जाणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने आपत्कालीन प्रसंगी त्यांचेशी संपर्क करणे शक्य होत नाही. तसेच जिल्ह्यातील अनेक आपत्ती प्रवण भागात तात्काळ आपत्तीची पूर्व सूचना दिल्यास संभाव्य आपत्तीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे सोईस्कर होईल. www.konkantoday.com