तटरक्षक दलात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे; हरियाणातील तिघांवर गुन्हा, ब्लु टूथही केले जप्त

0
35

रत्नागिरी : बनावट कागदपत्रांद्वारे तटरक्षक दलात संगनमताने भरती होण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री हरियाणामधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रत्नागिरी विमानतळ येथे तटरक्षक दलासाठी फायरमन या पदासाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देशभरातून आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सुरू होते.
कागदपत्रांची तपासणी करत असताना हरियाणामधून आलेल्या तिघांची कागदपत्रे तपासणी सुरु असतानाच सन्नी पालाराम (वय २८, रा. अलीपूर, जिंद हरियाणा), सोनू शिशुपाल (वय २२, भुडंगा, हरियाणा), सन्नी सुभाष भोसला (वय २३, रा. जीद हरियाणा) यांची कागदपत्रे तपासल्यानंतर तिघांकडे असलेली कागदपत्रे बनावट असल्याचे तेथे तपासणी करणाऱ्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले. तर तिघांकडे ब्लु टुथ डिव्हाईसही आढळून आले.
तपासणी करणाऱ्या अधिकार्‍यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर विमल रामकुमार जांगिड (वय ३५ रा. कुवारबाव) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ग्रामीण पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here