‘मोबाईल घेऊ नको’ असे सांगितल्याच्या रागातून दापोलीत मुलाची आत्महत्या
दापोली : तालुक्यामधील माटवण कोळथरकोंड येथील प्रथमेश तुपे या 17 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना 17 जून रोजी सकाळी 7:35 वाजण्याच्या सुमारास घडली. रेवती फावरे यांनी दापोली पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार त्यांचा नातू प्रथमेश हा नववी पास होऊन दहावीत शिकत होता. सकाळीच मोबाईल घेऊन बसलेला असल्यामुळे मोबाईल घेऊ नको, असे त्याला सांगितले. त्याचा राग येऊन कोणतेतरी विषारी औषध घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे घेऊन गेले असता उपचार चालू असतानाच डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.