राज ठाकरे यांच्या प्रेमापोटी छातीवर त्यांची छबी गोंदवून घेणारा सोलापूरचा जबरी फॅन

0
81

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. अशातच राज ठाकरेंचा एक जबरा फॅन समोर आलाय.राज ठाकरेंची छबी एका तरुणानं राज ठाकरेंची धबी आपल्या छातीवर गोंदली आहे. हा तरुण सोलापूर जिल्ह्यात राहणारा आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील मोडनिंब इथं राहणारा हा तरुण असून तो राज ठाकरेंचा अनेक वर्षांपासून चाहता आहे. राज ठाकरे कायम हृदयात राहावेत यासाठी मी हा टॅटू छातीवर गोंदवून घेतला असल्याचं त्यानं म्हटलंय. मोडनिंबमध्ये राहणाऱ्या या तरुणाची सध्या चर्चा रंगली आहे. मोडनिंबमधील या तरुणाचं नाव आहे, विशाल भांगे! राज ठाकरेंचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांचे चाहते आहेत.
पण म्हणून थेट छातीवर राज ठाकरेंची छबी गोंदवून घेणारा, विशाल भांगे हा राज ठाकरेंचा पहिलाच चाहता असावा.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here