वर्षअखेरीस रत्नागिरीचे विमानतळ सुरू होणार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही
वर्षअखेरीस रत्नागिरीचे विमानतळ सुरू होणार
गेले कित्येक दिवस रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या बातम्या आल्या. या चार महिन्यात सुरू होईल, अमूक दिवशी चालू होईल, अशी माहिती दिली जात होती. परंतु या विषयावर माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी महत्वाची माहिती रत्नागिरी दौर्यात दिली आहे. या वर्षअखेरीस रत्नागिरीचे विमानतळ सुरू होणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या विमानतळामुळे पर्यटन नव्हे तर रत्नागिरी शहराबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याची उंची देशभरात वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डिसेंबर अखेरपर्यंत विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे सांगून पुढे बोलताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, मला सांगायला आनंद होतोय की कोकणातील दोन विमानतळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन विमानतळ सुरू होण्यासाठी मी तेव्हा खूप प्रयत्न केले होते. त्यातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे तेव्हा भूमिपूजन करून उदघाटनही झाले आहे.
रत्नागिरी विमानतळासाठी फक्त एकच अडचण होती की रत्नागिरी विमानतळ हे कोस्टगार्डच्या ताब्यात आले. त्यावेळी सुरेश प्रभू तत्कालीन संरक्षण मंत्र्यांना भेटले. त्यासाठी आवश्ययक असलेली आर्थिक तरतूद करण्यासाठी सांगून तशी तरतूद करायला भाग पाडले. विमानतळाला जागा कमी पडत होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती जागाही वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
www.konkantoday.com