बारावीच्या गुणपडताळणीसाठी ऑनलाइन करता येणार अर्ज

रत्नागिरी : बारावीच्या गुणपडताळणीसाठी शुक्रवार 10 जून ते सोमवार 20 जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार 10 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच यासोबत ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. छायाप्रतीसाठी प्रतिविषय 400 रुपये शुल्क आहे तर पुनर्मूल्यांकनासाठी 300 रुपये प्रति विषय इतके शुल्क आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर बुधवारी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. मुंबई विभागाची घसरगुंडी पहायला मिळाली. मुंबई विभागाचा निकाल 90.91 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) मार्च-एप्रिल 2022 ची लेखी परीक्षा शुक्रवार दि. 4 मार्च ते गुरूवार दि. 7 एप्रिल आणि प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मुल्यमापन परीक्षा सोमवार दि. 14 फेब्रुवारी ते गुरूवार दि. 3 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत कोकण विभागातून एकूण 29 हजार 540 नियमित विद्यार्थ्यांनी केली होती. यापैकी 29 हजार 413 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 28 हजार 595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 97.21 एवढी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 19 हजार 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 91 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 18 हजार 402 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 96.39 एवढी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 हजार 957 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 हजार 322 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 10 हजार 193 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेची टक्केवारी 98.75 एवढी आहे. यंदाच्या वर्षी 426 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 422 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 62.08 एवढी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून 5 हजार 975 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली. यातील 5 हजार 857 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून 4 हजार 661 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 4 हजार 343 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून 7 हजार 979 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 7 हजार 709 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक शाखेतून 463 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 457 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टेक्निकल सायन्स शाखेतून 13 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button