सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथील ओंकार कदम याने जोपासला नाणी जमा करण्याचा छंद
अनेकांना विविध छंद असतात त्या छंदापोटी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालमधील युवक ओंकार कदम हा देखील असाच एक छंद जपणारा युवक असून त्याला लहानपणापासून नाणी जमा करण्याचा छंद होता. त्याने हा छंद आतापर्यंत जपला आहे. यासाठी त्याने आपल्या घरामागील शेताच्या मांगराच्या खोलीत एक छोटे संग्रहालय सुरू केले आहे. त्याच्या या संग्रहालयात १८५ देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी इ. स. ३०२ व्या शतकापासूनच्या अनेक भारतीय सम्र्राटांनी आपल्या काळात आणलेली चलनातील नाणी जोपासली आहेत.
हे करत असताना त्याने त्याचा इतिहास देखील सुंदर पद्धतीने मांडला आहे. त्यामुळे हे त्याचे संग्रहालय आकर्षण ठरत आहे. ओंकार हा पदवीधर झाला असून त्याचे स्वतःच्या मालकीचे किराणा मालाचे दुकान आहे. आपला व्यवसाय सांभाळून हा छंद जोपासत संग्रहालयाची निर्मिती केली आहे.
www.konkantoday.com