दापोलीत पर्यटकांवर हल्ला करणार्यांना जामीन मंजूर
दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्र किनार्यावरील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या चिंचवड येथील पर्यटक तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपींना येथील खेड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयितांच्या वतीने विधिज्ञ सुधीर बुटाला यांनी काम पाहिले. दापोली येथे पर्यटनासाठी आलेले शुभम परदेशी, सूरज काळे व अन्य तिघे पर्यटक हर्णै समुद्र किनार्यावरील एका हॉटेलमध्ये थांबले होते. दि. 15 मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडे जायला निघाले होते. गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा रागातून या तिघांनी पाठलाग करत कोयत्याने हल्ला चढवला. यात शुभम परदेशी, सूरज काळे या हल्ल्यात जखमी झाले होते. या प्रकरणी संशयित भारत वामन मुळे (वय 46, व्यवसाय हॉटेल, रा. गिम्हवणे, दापोली), अंकुर अरुण माने (वय 26 रा. ओंकार सदन, दापोली) व सोनल सुधाकर अंबिये (वय 53, रा.गिम्हवणे ता. दापोली) या तिघांना दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. खेडच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिन मंजूर केला.