
वीज कुठे पडणार हे आता दामिनी अॅप सांगणार
पावसाच्या सुरुवातीच्या आणि मान्सून परतण्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचे मृत्यू होत असतात. जून, जुलै आणि त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत राज्यामध्ये वीज पडून अनेक ठिकाणी लोकांचे मृत्यू होत असतात.या घटना टाळण्यासाठी आता ‘दामिनी’ सरसावली आहे. वीज कुठे पडणार हे आता दामिनी अॅप सांगणार आहे. वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर याबाबत अलर्ट केले जाणार आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी या अॅपचा अशा संकटकाळात मोठा फायदा होणार आहे.सुरक्षित स्थळी जावे किंवा झाडाच्या खाली उभे राहू नये, झाडांचा आश्रय घेऊ नये या बाबत निर्देश मिळणार आहेत. त्यामुळे या अॅपचा उपयोग सर्वांनाच होणार आहे. या अॅपवर मिळणार्या सूचनांनुसार वीज पडण्याआधी लोकांना अलर्ट केले जाणार आहे. या अलर्टनुसार प्रशासकीय अधिकार्यांनी संबंधित ठिकाणी पूर्वसूचना दिल्यास नागरिकांना संकटाची कल्पना येईल आणि जिवीतहानी टाळता येईल. अनेकवेळा वीज पडून कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. त्यावर पृथ्वी मंत्रालयाने हे अॅप शोधून काढले आहे. वीज ज्या ठिकाणी पडणार त्या ठिकाणचे लोकेशन अॅपवर दाखविले जाईल.
वीस ते चाळीस कि.मी.चा परिसर दाखविला जाईल. या शिवाय अॅपवर ‘बिजली की चेतावनी नहीं है’ किंवा ‘बिजली की चेतावनी है’ या सारखे मेसेज दिले जाणार आहेत. प्रत्येक पाच मिनिटांनी या बाबत अपडेट माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला हे अॅप वापरण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत