खेकडे पकडायला जाण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षीय बालिकेची आत्महत्या
दापोली : आईने खेकडे पकडण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने एका 13 वर्षीय बालिकेने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 रोजी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील आंबवली येथे घडली आहे. नियती निवास राऊत (वय 13) असे या बालिकेचे नाव आहे. नियती ही दि. 22 रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास आपल्या आईकडे आपण खेकडे पकडायला जाण्यासाठी हट्ट करू लागली. यावेळी तिची आई नंदिनी राऊत यांनी तिला जाऊ नको असा सल्ला दिला. या गोष्टीचा राग येऊन रागाच्या भरात घरामागील विहिरीत उडी घेतली. आजूबाजूला कोणी नसल्याने तिला लवकर पाण्याबाहेर काढण्यात उशीर झाल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची खबर तिची आई नंदिनी राऊत हिने दापोली पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.