कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर याने प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी अवलंबिला नादखुळा फंडा

0
279


आजच्या काळात प्रेमासाठी काय पण करणारे युवक युवती कमी नाहीत
लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पहिल्या असतील. अनेक मुली तयार होतात तर अनेक मुली मुलाला नकार देतात. मात्र कोल्हापूरातल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीला लग्नासाठी नादखुळा प्रपोज केला आहे.याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
अनोखी लव्हस्टोरी
कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर आणि सांगली मधील उत्कर्षा. दोघेही बुधगाव-सांगली इथल्या वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती.

मात्र जेंव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेंव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे म्हंटल्यानंतर त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असं आपल्या घरच्यांना सांगितलंय. घरच्यांनीही हरकत न घेता मुलीला विचारण्याचं ठरवलं.

सौरभला उत्कर्षा आवडत असल्याने त्याच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी जाऊन बोलणी केली. पण उत्कर्षाच्या घरच्यांनी काही दिवस विचार करुन लग्नासाठी होकार कळवला.

मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने उत्कर्षाला प्रपोज करयाचं असं सौरभने ठरवलं होतं. त्यानुसार त्याने अनोकी शक्कल लढवली. कोल्हापूर सांगली हायवेवर त्याने एक भला मोठा होर्डिंग लावला. होर्डिंगवर ‘उत्कर्षा मॅरी मी – सौरभ’ असं लिहिलं. हायवेवरुन येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हे होर्डिंग उत्सुकतेचा विषय ठरलं.

त्यानंतर सौरभने उत्कर्षाला होर्डिंग लावलेल्या ठिकाणी नेऊन तिला सरप्राईज दिलं. इतकंच नाही तर सौरभवने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. या अनोख्या स्टाईलने उत्कर्षाला आनंदाचा धक्का बसला. तिने तात्काळ सौरभला होकार दिला. यानंतर या दोघांनी होर्डिंग समोर येऊन एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here