खेड : कल्याणवरून राजापूरला जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण रेलिंगवर कार आदळली. या अपघातात चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडनजीक गुरुवारी दि.१९ रोजी सकाळी ६.२० वा.च्या सुमारास हा अपघात झाला.
कृष्णा चोवबे (रा. कल्याण) हा त्याच्या ताब्यातील कार (एम.एच.०५, ई.एल. ८९८२) घेऊन कल्याण ते राजापूर येथे येथे जात असताना अपघात झाला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोटारीतून प्रवास करणारे रुपेश संदीप पांचाळ (वय २६), वनिता संदीप पांचाळ (वय १४), सिद्दीकी रुपेश पांचाळ (वय २२), यश योगेश पांचाळ (वय१९, सर्व रा.कल्याण) हे जखमी झाले. जखमींना कलंबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.