माजी खासदार, माजी राज्यमंत्री, समाजवादी नेते हुसेन दलवाई यांचे मुंबईत निधन
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावचे मूळचे रहिवासी, माजी राज्यसभा खासदार, माजी राज्य न्याय मंत्री व खेडचे माजी आमदार समाजवादी नेते हुसेन मिश्रीखान दलवाई यांचे मुंबई येथे निधन झाले. सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने वयाच्या 100 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दलवाई हे समाजवादी व काँग्रेसी विचारसरणीचे होते. खेडमधून विधानसभेची निवडणूक लढवली व आमदार म्हणून काम केले त्यानंतर त्यांनी न्यायमंत्री म्हणून काम पाहिले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासोबत त्यांनी विकासासाठी योगदान दिले.
लोटे येथील औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.