मिरकरवाडा जेटीवर आढळला खलाशाचा मृतदेह
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी येथील समुद्रात रविवारी दुपारी 3 वा. नेपाळी खलाशाचा मृतदेह आढळून आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर संदुराम चौधरी (वय 30, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. याबाबत बोटमालक शाहीद महम्मद हुसेन मिरकर (52, रा. गवळीवाडा ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, सागर चौधरी त्यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. शनिवारी रात्री 10.30 वा. ते बोटीवरील सर्व खलाशांची हजेरी घेत होते. तेव्हा त्यांना सागर बोटीवर दिसला नाही. शोध घेतला असता रविवारी दुपारी समुद्रात सागरचा मृतदेह आढळून आला.