कॅन्सरवरील किरणोपचारासाठी जिल्हा रूग्णालय यंत्रणा सज्ज

कर्करोगावरशस्त्रक्रियेऐवजी रेडिएशनद्वारे उपचार करून हा आजार बरा करणारे रेडिएशन ऑन्कॉलॉजी युनिट (कॅन्सरवरील किरणोपचार) रत्नागिरीत होणार आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयाने त्यासाठी जागेपासून सर्व तयारी असल्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. चिपळूणच्या वालावलकर रूग्णालयाव्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य कुठेही ही उपचार पद्धती नाही. जिल्हा रूग्णालयात हे युनिट झाल्यास अनेक कॅन्सर रूग्णांना त्याचा फायदा होणार असून आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे ठरणार आहे. एवढेच नव्हे तर कॅथ लॅबच्यादृष्टीनेही आमची तयारी आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. राज्यात विविध वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरीत रेडीएशन ऑन्कॉलॉजीची युनिट स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button