मुख्य अभियंता मा. श्री. विजय भटकर यांचे प्रतिपादन
कोकण परिमंडळ : महावितरण कंपनीच्या प्रगती व ग्राहक सेवेसाठीचे वीज कर्मचाऱ्यांचे कार्य कौतूकास्पद आहे. ग्राहक समाधानासाठी प्रत्येकाने आपली कामगिरी अधिक उंचावून ग्राहकाभिमुख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यात सातत्य राखून सहकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मुख्य अभियंता मा. श्री. विजय भटकर यांनी व्यक्त केली. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी महावितरणच्या कोकण परिमंडळातील तंत्रज्ञ व यंत्रचालक संवर्गातील 32 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार मुख्य अभियंता मा. श्री. भटकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. रत्नागिरी परिमंडळ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त परिमंडळाच्या प्रांगणात मुख्य अभियंता यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी अधिक्षक अभियंता मा. श्री. माणिकचंद लवटे, कार्यकारी अभियंता (प्र) श्री.नितीन पळसुलेदेसाई, उपमुख्य औद्योगिकसंबंध अधिकारी (प्र) श्री.आप्पासाहेब पाटील, व्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. रमेश पावसकर, उपव्यवस्थापक (मासं) श्री. संजय वैशंपायन यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. भटकर यांनी विद्युत सुरक्षेच्या बाबतीत सजग राहून अपघात विरहीत कामकाज करावे,अशी सूचना वीज कर्मचाऱ्यांना केली. वीज खरेदीसह दैनंदिन खर्च भागविण्यासाठी वीज बिलांची वसूली हा महावितरणच्या महसुलाचा एकमेव स्त्रोत आहे. तेंव्हा वीज बिल वसुलीची कामे प्राधान्याने करावीत. त्यासोबतच वीज ग्राहकांना सुरळीत वीजसेवा देण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे लवकर पुर्ण करुन घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
वीज सेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तंत्रज्ञ व यंत्रचालक संवर्गातील वीज कर्मचाऱ्यांचा कौतूक सोहळा महावितरणमध्ये पार पडला. पुरस्कार स्वरूपात सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तंत्रज्ञ संवर्गात मुख्य तंत्रज्ञ वसंत पारधी (मंडणगड उपविभाग), महेंद्र गिरकर (देवगड उपविभाग), प्रधान तंत्रज्ञ दिलीप सुर्वे (शाखा कार्यालय-पाचल), संदीप गोसावी (मिठबांव), प्रकाश परूळेकर (का. कट्टा), गणेश पाटेकर (वैभववाडी 1), जानू पांढरमिसे (बांदा 2), श्याम गोसावी (पणदूर), वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश भारती (रत्नागिरी शहर 3), अजय चव्हाण (पावस 1), प्रभाकर मांडवकर (लांजा 2), सुभाष यादव (देवरुख ग्रामीण), निलेश राणे (आरवली), दिनेश कांबळे (कोतवडे), गणेश कदम (चिपळूण खेर्डी), जयेंद्र सावंत (चिपळूण ग्रामीण 2), पांडुरंग गुरव (असुर्डे), वसंत धनावडे (आबलोली), विलास गोसावी (खेड ग्रामीण 3), संतोष नाके (लोटे), प्रवीण रहाटे (दापोली ग्रामीण 2), मोहन पडवळ (फोंडा), सखाराम वेंगुर्लेकर (पाट), लक्ष्मण साटेलकर (वेंगुर्ला शहर), दर्शन बागवे (भेडशी), तंत्रज्ञ जयकांत पंडे (आडिवरे), विकास धनावडे (हर्णे) या 27 कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंत्रचालक संवर्गात प्रधान यंत्रचालक संजय भोसले (33/11 केव्ही उपकेंद्र-लवेल), यंत्रचालक उदय सावर्डेकर (सावर्डे), वरिष्ठ यंत्रचालक लक्ष्मीकांत ओटवणेकर (इन्सुली), यंत्रचालक प्रकाश सावंत (कुवारबांव), रोहिदास कुर्ले (वैभववाडी) या कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
www.konkantoday.com