परशुराम घाट रुंदीकरण कामाची जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केली पहाणी
रत्नागिरी दि. 5:- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता रुंदीकरणाचकामाची जिल्हाधिकारी डॉक्टर बी एम पाटील यांनी पाहणी केली. व आढावा घेतला.
येणाऱ्या मान्सून पूर्वतयारीचा अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आवश्यक त्या उपायोजना व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील तहसीलदार विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाच्या उप अभियंता मेश्राम, रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, उपअभियंता मडकईकर हे उपस्थित होते
दिवसाला सहा तास वाहतूक बंद ठेऊन या कामाला लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.