बोट कुटूंबियांचा मदतीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन पुढे सरसावली
गेली १४ वर्ष मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज समाजातील अंध, विकलांग, मतिमंद, मुलांसाठी कार्यरत आहेत. अशा व्यक्तींना त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासाबरोबरच त्यांना सक्षम स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कायमच प्रयत्नशील आहेत.त्याचाच एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील सलाऊद्दीन बोट यांना मदत करण्यात आली. श्री. बोट यांची तीनही मुले अंध आहेत. बोट यांची करूण कहाणी ऐकताच त्यांच्या मदतीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन पुढे सरसावली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनकडून बोट कुटुंबियांना रमजान ईदच्या दिवशी डिफ्रिजरेटर मोफत देण्यात आला. डिफ्रिजरेटरच्या सहाय्याने आइस्क्रिम आणि अन्य वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करता येणार आहे.
सलाऊद्दीन आणि अश्मत बोट यांच्या कुटुंबात तीनही मुले अंध जन्माला आल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई-वडीलांनी कष्ट करून तीन अंध मुलांना सांभाळले. आता मात्र त्यांचे हात, पाय थकले आहेत. त्यांना मदतीची गरज होती. जहीर (४० वर्ष), जुनैद (३४ वर्ष) आणि एजाज (३२ वर्ष) अशी या तीन अंध मुलांची नावे आहेत. बोट कुटुंबाची ही करूण कहाणी प्रसिद्ध झाली. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने बोट कुटुंबाना मदत करण्याचे ठरवले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने बोट कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना काय अपेक्षित आहे, हे जाणून घेतले. बोट कुटुंबियांनी व्यवसायासाठी डिफ्रिजेरटरची मागणी केली. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन आज रमजान ईदचा मुहूर्त साधत बोट कुटुंबियांना डिफ्रिजरेटर मोफत दिला.
या वेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे अभिषेक साळवी, सामना रत्नागिरीचे श्री. दुर्गेश आखाडे , इब्राहिम आंबेडकर, निसार बोट, अल्ताफ पावसकर, नसरीन बोट, जुनैद बोट, जहीर बोट आणि एजाज बोट उपस्थित होते. या वेळी सलाऊद्दीन बोट यांनी सहकार्याबद्दल फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनचे आभार मानले.
www.konkantoday.com