मुंबई – गोवा महामार्गावर तळेकांटे येथे अपघात

संगमेश्वर : ओव्हर टेक करत असताना मुंबई – गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे स्वीफ्ट कारने विरूध्द दिशेला जाऊन इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत. नितीन मनोहर खातू (वय ५६, नावडी बाजारपेठ म, संगमेश्वर), सदफ इम्रान खान (वय ३५), तुबा इम्रान खान (वय १३, दोन्ही राहणार कुर्ला, मुंबई ) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , महंमद इम्रान साजिद खान (वय ३८, कुर्ला मुंबई ) हा आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कार रत्नागिरी ते मुंबई असा जात असताना तळेकांटे स्मशानभूमी येथे हा अपघात झाला. याबाबतची फिर्याद नितीन खातू यांनी (वय ५६, नावडी, संगमेश्वर ) संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार स्वीफ्ट कार चालक महंमद खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button