सिंधुदुर्ग कलावंत मंचच्यावतीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात रंगणार कोकण चित्रपट महोत्सव
कोकणातील निसर्ग आणि तिथल्या पारंपारिक कला या महाराष्ट्राची कलासंस्कृती उंचावणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर कोकणाचा हा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि मंडळी एकत्र येत ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेची स्थापना केली.या संस्थेतर्फे ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन होणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाची रूपरेषा व नामांकन प्राप्त चित्रपट व विजेत्यांची नावांची घोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहचविण्यासोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी, स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com