कोकणात येणार्‍य‍ा पर्यटकांची एमटीडीसीच्या रिसॉर्टना पसंती

0
161

सध्या सुट्ट्यांचा व हापूसचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांचा कोकणात येण्याचा कल वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टना होत आहे
रत्नागिरी सिंधुदुर्गमधील पाचही रिसॉर्ट मार्च महिन्यात वीस दिवस तर एप्रिल महिन्यात दहा दिवस फुल्ल होती. संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरी एमटीडीसी अव्वल आहे. असे कोकण विभागीय पर्यटन अधिकारी ऍड. दीपक माने यांनी सांगितले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दोन वर्षाच्या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमटीडीसीची सर्वच रिसॉर्ट फुल्ल होती. त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रावर झाला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पर्यटनात कोकण विभाग आघाडीवर राहिला आहे. दोन्ही जिल्ह्यातील एमटीडीसीच्या निवासस्थानाला पर्यटनाला सर्वाधिक पसंती दिली आहे. गणपतीपुळे एमटीडीसी निवासस्थानात उतरलेल्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली रिसॉर्ट ९५ टक्के बुकींग झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्‍वर, गणपतीपुळे, रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्‍वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्‍वर येथे एमटीडीसी सुंदर रिसॉर्ट आहेत. दर्जेदार हॉटेल्ससह सुंदर भोजनाची व्यवस्था पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. यामुळेच कोकणात येणार्‍या पर्यटकांची संख्या हळुहळू वाढत आहे. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here