
एसटी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेच्या दरात 1 मेपासून वाढ
एसटी महामंडळाने अलिकडेच उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या मालवाहतूक सेवेच्या दरात वाढत्या इंधन दरामुळे 1 मेपासून वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एकेरी वाहतुकीसाठीचा किमान दर आधी चार हजार रुपये होता.आता नव्याने निर्णयाने किमान दर 4 हजार 500 रुपये इतका वाढविण्यात आला आहे, तर आधी 100 कि.मी.पर्यंतच्या वाहतुकीसाठी 48 रु.प्रति कि.मी. दर होता. तर 101 कि.मी. ते 250 कि.मी.साठी 46 रु.प्रति कि.मी. दर होता तो आता 200 कि.मी.पर्यंत 57 प्रति कि.मी. तर 201 कि.मी.च्या पुढे 55 रू.प्रति कि.मी. अशी दर वाढ करण्यात आली आहे.
www.konkantoday.com