वाळू उपसा मीच करणार… तू भागीदार हो… वर्चस्वाच्या वादातून दापोलीत वाळू व्यावसायिकांमध्ये हाणामारी

0
74

दापोली : तालुक्यातील दाभिळ पांगारी खाडी पट्ट्यात दोन वाळू व्यावसायिकांमध्ये हाणामारी झाली असल्याची चर्चा सध्या दापोली तालुक्यात आहे. या हाणामारीतून एका व्यावसायिकाच्या हाताला दुखापत झाली आहे. वाळू उपसा मीच करणार…तू भागीदार हो… या वर्चस्वाच्या स्पर्धेतून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे.
पांगारी खाडीत वाळू उपसा करण्याच्या इराद्याने महसूल विभागाने 2020 साली सील केलेली जवळपास 15 लाख किमतीची क्रेन चोरीला गेली आहे. त्यामुळे ही खाडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महसूल विभागाला या क्रेनचा थांगपत्ता लागला नाही. आता हाणामारीचे प्रकारही या परिसरात घडू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here