फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे विकलांग मुलांसाठी शिबिर
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. व मुकुल माधव फाउंडेशन गेली ६ वर्षे विकलांग मुलांसाठी मिशन सीपी हा उपक्रम राबवित आहेत. सातारा, मसार (गुजरात), रत्नागिरी येथील विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालू करून त्यांना लागणारी फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, लागणारी उपकरणे, शस्त्रक्रिया अशा प्रकारचे उपक्रम या प्रकल्पामार्फत राबविले जातात.
याचाच एक भाग म्हणून २३ व २४ एप्रिल रोजी फिनोलेक्स पुनर्वसन केंद्र,रत्नागिरी येथे जिल्ह्यातील सुमारे १६० मुलांना या शिबिरात तपासण्यात आले. कोरोनाच्या महामारीत या केंद्रात आर. के. केबल नेटवर्कच्या सहाय्यातून विकलांग मुलांना ऑनलाइन थेरपी देण्यात आली होती. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असून अशा मुलांना पुनर्वसन शिबिराची आवश्यकता होती. याकरिता फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. व मुकुल माधव फाउंडेशनने संचेती हॉस्पीटल, पुणे व भारती हॉस्पीटल यांच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यातील विकलांग मुलांसाठी या शिबिराचे नियोजन केले होते.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यादव, सौ. घाणेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे, संचेती हॉस्पीटलचे डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. लीना श्रीवास्तव, सलोनी राजे, स्थानिक ड्रॉक्टर्स, फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबिराला सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रमाचे विशेष सहकार्य लाभले. असेच सहकार्य भविष्यातही या विकलांग पुनर्वसन केंद्राला मिळेल, अशी अपेक्षा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. आणि मुकुल माधव फाउंडेशनने व्यक्त केली.