खेड तालुक्यातील सवेणी येथे गोठ्याला आग लागून नुकसान
खेड : सवेणी लिंगायतवाडी येथील भिवा चंद्रकांत साबळे यांच्या मालकीच्या गोठ्याला शुक्रवारी दि. 22 एप्रिल सायंकाळी 4 वाजता अचानक लागली. यात छप्पर जळून नुकसान झाले. या गोठ्यात असलेली गुरे, बकरी व वासरू यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. गोठ्याजवळच आजूबाजूला असलेला कचरा गोळा करून जाळल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेळीच ही घटना लक्षात आल्याने ग्रामस्थांनी धावपळ करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गोठ्यातील जनावरे वाचली. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.