कोकण रेल्वे मार्गावर २२ ते २६ एप्रिल या कालावधीत ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर २२ ते २६ एप्रिल या कालावधीत ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुसह्य होणार आहे.मुलांच्या परीक्षा संपल्याने उन्हाळी सुट्टीसाठी आता चाकरमन्यांनी कोकणात गावी जाण्यास तयारी केली असून त्यामुळे प्रवाशांच्या या वाढत्या संख्येमुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्येही गर्दी होऊ लागली आहे.
त्यामुळे कोकणात जाणाऱ्या तसेच गोव्याला फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २२, २४ आणि २६ या तिन दिवशी सकाळी ७.५० वाजतागाड्या सोडण्यात येणार आहे, तर मडगावहून याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता सुटल्या जाणार आहे.
या गाड्यांमध्ये दोन तृतीय वातानुकूलित, २ वातानुकूलित चेअर कार, २ शयनयान, ४ आरक्षित द्वितीय श्रेणी आसन, गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि जनरेटर व्हॅनचा समावेश असेल.
अशाप्रकारे कोकणात धावणार गाड्या
( ०१०४७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२ एप्रिल.२०२२, २४एप्रिल २०२२ आणि २६एप्रिल.२०२२ रोजी (३ फेऱ्या) ०७.५० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
(०१०४८) मडगाव येथून. २२एप्रिल २०२२, २४एप्रिल२०२२ आणि २६एप्रिल२०२२ रोजी (३ फेऱ्या) १९.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल.
या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी.असे थांबे देण्यात आले असून
विशेष ट्रेन क्र. ०१०४८ / ०१०४८ साठी विशेष शुल्कासह बुकिंग २१एप्रिल २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
www.konkantoday.com