आंजर्ले खाडीत वाळू उपशावर कारवाई; दोन बोटी, सक्षन पंप बुडवले

0
71

दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर  वाळू उपशावर दि. 17 रोजी रविवारी दापोली महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी धडक कारवाई करून दहा लाखाचे दोन सक्शन पंप आणि आठ लाखांच्या दोन बोटींवर कारवाई केली. या धडक कारवाईमध्ये येथील सहा ब्रास वाळू जप्त केली आहे. ही कारवाई दापोलीचे प्रांत अधिकारी शरद पवार, दापोली तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार रणजीत शिरवळकर, प्रभारी मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी केली. यावेळी या महसूल पथकाने पोलिसांची मदत घेतली. दापोली तालुक्यात या खाडीमध्ये मागील अनेक दिवस बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे, अशा तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने ही कारवाई  करीत वाळू उपसा करणार्‍या दोन बोटी तसेच सक्शन पंप बुडवल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here