
अखेर वांद्री उक्षी ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर बावनदी गाळ उपसाला सुरुवात
गेल्या अनेक वर्ष बावनदी पात्रातील गाळ उपसण्यासाठी वांद्री उक्षी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. अखेर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांच्या मदतीने आणि वांद्री उक्षी गाळ उपसा समितीच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून बावनदी नदीपात्रात ला गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे.
नुकतेच वांद्री येथे बावनदी पात्रातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पूर परिस्थितीमध्ये बावनदी पत्राच्या साचलेल्या गाळामुळे बाव नदी काठावर वसलेल्या गावांना पुराचा त्रास होत होता.लोकांना पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगावे लागत होते.आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे सुद्धा आर्थिक नुकसान होत होते तोंडाला आलेला घास या पुरामध्ये वाहून जात होता अनेक समस्यांना या परिसरातील लोक कंटाळून गेले होते. बावनदी पत्रात साचलेल्या गाळ जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत येथील समस्या मार्गी लागणार नाही यासाठी वांद्री उक्षी ग्रामस्थ एकवटले आणि त्यांच्या एकीमुळे आज बावनदी पात्रातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. गाळ उपसण्यासाठी अभियांत्रिकी विभाग चिपळूण अलोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाव नदी पात्रातील गाळ काढला जाणार आहे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी आर्थिक तरतूद करून दिली असून सर्व पत्रव्यवहार करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बावनदी पात्रातील गाळ उपसा च्या कामाला सुरुवात झाली असून येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री अनिल परब जिल्हाधिकारी बी एन पाटील तसेच वांद्री उक्षी गाळ उपसा समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.या उदघाट्न सोहळ्या प्रसंगी समितीचे अध्यक्ष अन्वर गोलंदाज , खजिनदार विक्रांत गांधी,सचिव विकास ताठरे ,स्वप्निल भाटकर ,प्रविण मयेकर दिलीप मयेकर , सुभाष सलीम , सरपंच विश्वनाथ मांजरेकर ,मकरंदगांधी,संतोष भोंगळे ,महेश भिगार्डे ,गणपत मोहिते, चंद्रकांत मोहिते, संतोष नार्वेकर, राजेश हळदणकर, पत्रकार रमजान गोलंदाज ,सुरेश चोचे,संदेश गांधी, मनोज खातू, राजेंद्र देसाई, पद्माकर देसाई, इकबाल राजापकर, रोहिणी पवार,मुक्त्यार काझी, विनायक सनगरे,आदी सह वांद्री उक्षीचे ग्रामस्थ उपस्थित होते.