
रत्नागिरी टिळक आळी येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून लांबवली दुचाकी
रत्नागिरी शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील टिळक आळी येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून 9 एप्रिल रोजी अॅक्सेस दुचाकी चोरट्याने लांबवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहीत सुधीर उपळेकर (वय 30, राहणार घरकुल अपार्टमेंट टिळक आळी, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी आपली दुचाकी (एमएच-08-एबी-1856) अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दुसर्या दिवशी सकाळी ते दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.