कोळंबेच्या अक्षय पडवळचे धामणी रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अक्षय पडवळची नोंद झाल्याचे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अक्षयचा सत्कार करण्याचे कोळंबे ग्रामस्थांनी ठरवले. धामणी रेल्वे स्थानक ते कोळंबे अशी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले.
त्यानुसार सर्व ग्रामस्थ त्याची रेल्वे स्थानकावर भर दुपारी वाट पहात होते. अक्षय दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धामणी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. सर्वप्रथम गावातील महिलांनी त्याचे औक्षण केले. त्यानंतर पेढा भरवून त्याच कौतुक करण्यात आलं. त्यानंतर ढोल-ताशे वाजवून स्वागत झाले. हार, तुरे, पुष्पगुच्छ, नारळ देऊन अनेकजण त्याचा सत्कार करण्यासाठी सरसावत होते. अनेकांनी सेल्फीही काढल्या. एक सेलिब्रिटीच रेल्वेस्थानकावर आल्याचे जणूकाही भासत होते. अक्षयला पेढा भरवून आई-वडिलांनी कौतुक केले. संगमेश्वर पोलीस स्थानकाचे सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर कोळंबे गावचे समाजसेवक अतिष पाटणे,नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज,संतोष चव्हाण गुरूजी, दत्तात्रय खातू, सरपंच पडवळ, नथुराम पडवळ, नारायण चव्हाण, जगन्नाथ मुळ्ये, प्रशांत मुळ्ये, रामचंद्र पडवळ, चंद्रकांत भरणकर उपसरपंच, वडील – परशुराम पडवळ, आई – प्रतिज्ञा पडवळ, स्नेहल बहीण, रोशन करंडे, माजी पंचायत समिती सदस्या वेदांती अतिश पाटणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोळंबे येथे आल्यानंतर ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन अक्षयची मिरवणूक गावाच्या दिशेने निघाली. यावेळी अनेकांनी त्याचे कौतुक केले. निवृत्त शिक्षक खातू म्हणाले की, कोळंबी गावच्या सुपुत्राने आपल्या गावाच नाव मोठे केले आहे. अतिशय गरीब परिस्थितीत कोळंबेच्या एसकेपीएम हायस्कुलमध्ये शिक्षण घेऊन मुंबईला जाऊन मोठं यश मिळवलं आहे. आज त्याने मोठी गरुडझेप घेतली आहे. आर्मीमध्ये भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन देशाचे भावी सैनिक घडवण्याचं काम तो करत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. त्याने अशीच उंच भरारी घ्यावी आणि आपल्या गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवावे अशा शुभेच्छा व्यक्त करत गावातील सर्व ग्रामस्थ तुझ्या पाठीशी आहेत. जेव्हा जेव्हा तुला मदत लागेल तेव्हा तू हाक दे आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी अक्षयला दिला. यावेळी अनेकांनी त्याला आर्थिक मदतही दिली.
यावेळी अक्षय म्हणाला, गावातील गोरगरीब मुलांना पोलीस भरती, सैनिक भरतीसाठी सर्वप्रकारचे मार्गदर्शन आपल्याकडून केले जाईल असे सांगितले.
www.konkantoday.com