हिंदूराष्ट्रसेना प्रमुख धनंजयभाई देसाई हे रत्नागिरीत
रत्नागिरी: हिंदूराष्ट्रसेना प्रमुख धनंजयभाई देसाई हे रत्नागिरीत येत असून ०९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ रत्नागिरी येथील अंबर हाॅल येथे सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन हिंदुराष्ट्र सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सागर कदम यांनी केले आहे.
८ एप्रिल रोजी सकाळी हिंदूराष्ट्रसेना प्रमुख धनंजयभाई देसाई ह्यांचे रत्नागिरी साखरपा भंडारवाडी तिठा आगमन होवून तेथुन रॅली काढत धनंजयभाई देसाई चिपळूण ला खासगी कार्यक्रमाला जाणार आहेत. या रॅलीसाठी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन हिंदूराष्ट्रसेनेचा पदाधिकारी यांनी केली आहे. ०८ एप्रिल रोजी सायंकाळी चिपळूणहून रत्नागिरीला येताना संगमेश्वर येथील कार्यकर्त्यांची भेटीगाठी व रत्नागिरीकडे येणार आहेत. ०९ एप्रिल रोजी रत्नागिरीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्याचदिवशी सायंकाळी ४ वाजता रत्नागिरी येथील अंबर हाॅल येथे सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे.
www.konkantoday.com