जिल्हा रुग्णालयात 9 रोजी मोफत मूत्ररोग निदान, उपचार शिबिर
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मोफत मूत्ररोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील मगदूम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे शिबिर होणार आहे.
तज्ज्ञ डॉक्टर विश्वनाथ मगदूम, डॉ. प्रसाद मगदूम, डॉ. विजय चव्हाण, डॉ. मौसमी घुणके, डॉ. अरूण साठे, डॉ. ज्योती कदम, डॉ. योगिता नाईक, डॉ. प्रशांत पाटील हे रुग्णांची आरोग्य तपासणी करणार आहेत. शिबिरामध्ये तज्ज्ञांकडून रुग्ण तपासणी, रक्त व लघवी तपासणी, युरोफ्लोमेट्री इत्यादी चाचण्या आणि औषधोपचार पूर्णत: मोफत करण्यात येणार आहेत. आवश्यकता असणार्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जाणार आहेत. मुतखड्याची लक्षणे, प्रोटेस्ट ग्रंथीच्या आजाराची लक्षणे, मूत्रमार्ग कॅन्सरची लक्षणे असणार्यांंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी येताना यापूर्वीचे सर्व सोनोग्राफी, एक्स-रे व इतर रिपोर्ट घेऊन यावेत, असे कळविण्यात आले आहे.